जिल्हा

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना दिले 'जेईई-नीट'चे धडे

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना दिले 'जेईई-नीट'चे धडे
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना दिले 'जेईई-नीट'चे धडे फोटो: ठाणे वैभव

विद्यार्थिनींनी जिल्हाधिकाऱ्यांना बांधली कृतज्ञतेची राखी

ठाणे: पिसे आश्रमशाळेत सुमारे २०० विद्यार्थिनी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांची तयारी करत असून या जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांना परीक्षेचा कानमंत्र देत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज भिवंडी तालुक्यातील पिसे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेला सदिच्छा भेट देऊन तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसिलदार अभिजीत खोले, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेची इमारत, बांधकामाचा दर्जा, शिक्षक संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि मूलभूत सोयीसुविधांचा थेट आढावा घेतला. वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.

या आश्रमशाळेत सध्या सुमारे २०० विद्यार्थिनी जेईई आणि नीट या अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांची विशेष तयारी करत आहेत. स्वतः वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधताना अभ्यासाचे अचूक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे तंत्र याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आयुष्यात यश मिळवण्यासाठी अभ्यासाला कोणताही पर्याय नसून सातत्य आणि कठोर परिश्रमाने कोणतेही शिखर गाठता येते, असा प्रेरणादायी कानमंत्र त्यांनी दिला.

या संवादादरम्यान विद्यार्थिनींनी शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा आणि बहुउद्देशीय सभागृह सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने सकारात्मक पाऊल उचलत, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

अभ्यासामुळे रक्षाबंधनाला घरी न जाऊ शकलेल्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना 'आमचे पालक आपणच आहात' अशा आपुलकीच्या भावनेतून राखी बांधली. या अनोख्या आणि भावूक क्षणामुळे आश्रमशाळेत एक आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा अनुभवता आला.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सुरक्षितता, स्वच्छता आणि आश्रमशाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असून, या भेटीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये मोठा आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475